इनर इंजिनिअरिंग : देव खरोखर अस्तित्वात आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

तुमच्या सध्या अनुभवात नसलेल्या गोष्टीबद्दल मी बोललो तर ते तुम्हाला समजणार नाही. समजा तुम्ही कधीच सूर्यप्रकाश पाहिला नाही आणि सूर्यप्रकाश पाहण्यासाठी तुम्हाला डोळे नाहीत.

इनर इंजिनिअरिंग : देव खरोखर अस्तित्वात आहे का?

तुमच्या सध्या अनुभवात नसलेल्या गोष्टीबद्दल मी बोललो तर ते तुम्हाला समजणार नाही. समजा तुम्ही कधीच सूर्यप्रकाश पाहिला नाही आणि सूर्यप्रकाश पाहण्यासाठी तुम्हाला डोळे नाहीत. मी सूर्यप्रकाशाबद्दल बोललो, तर मी त्याचे किती प्रकारे वर्णन केले हे महत्त्वाचे नाही, ते काय आहे हे समजू शकणार नाही. सध्या तुमच्या अनुभवात नसलेली कोणतीही गोष्ट तुम्ही समजू शकत नाही. माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे किंवा न मानणे हा एकमेव पर्याय आहे. तुमचा माझ्यावर विश्वास असो किंवा नसो, ते तुम्हाला खरोखर कुठेही घेऊन जाणार नाही.

तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात तर तुम्ही स्वतःला मूर्ख बनवाल, कारण खरंच नकळत तुम्ही फक्त जाणून घेण्याचे ढोंग कराल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, तर तुमच्या अनुभवात नसलेली एखादी गोष्ट जाणून घेण्याची शक्यता तुम्ही नष्ट कराल.

भारतीय संस्कृतीत देव कुठेतरी बसून काहीतरी करत असतो, अशी काही विशेष समजूत नाही. निदान काही शतकांपूर्वी तरी तसे नव्हते. भारतात पूजेसाठी मंदिरे निर्माण झाली नाहीत. केवळ कालांतराने, गेल्या सहा-सात शतकांत ते आता जसे आहेत तसे झाले आहेत. मंदिर बांधणे हे एक सखोल शास्त्र आहे. परिक्रमा, गाभारा, मूर्तीचा आकार, मूर्तीने धारण केलेली मुद्रा आणि अभिषेक प्रक्रिया या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळल्या तर ऊर्जेचा एक शक्तिशाली भोवरा निर्माण होऊ शकतो. खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही एक यंत्रणा आहे जी तुम्ही तयार करत आहात. या संस्कृतीत मंदिरे अशीच निर्माण झाली.

आपल्या परंपरेत तुम्हाला कोणीही सांगितले नाही की तुम्ही मंदिरात गेलात तर पूजा केलीच पाहिजे, पैसे दिले पाहिजे किंवा काही मागावे. हा परंपरेचा भाग नाही. ही गोष्ट आता लोकांनी सुरू केली आहे. परंपरेनुसार, आपल्याला सांगितले आहे की, तुम्ही मंदिरात गेलात तर तुम्ही थोडा वेळ शांत बसले पाहिजे आणि त्यानंतरच निघाले पाहिजे. पण आज तुम्ही फक्त तुमचा पृष्ठभाग जमिनीवर टेकवून लगेच पळ काढता. ही काही मंदिरात जाण्याची पद्धत नाही. तुम्ही तिथे बसणे आवश्यक आहे कारण तिथे ऊर्जेचे क्षेत्र तयार केले गेले आहे. सराव असा होता की, सकाळी, तुम्ही दिवस सुरू करण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी आणि तुमचा व्यवहार करण्यापूर्वी, तुम्ही सर्वप्रथम मंदिरात जा आणि थोडा वेळ बसा. जीवनाच्या सकारात्मक स्पंदनेंसह स्वतःला रिचार्ज करण्याचा हा एक मार्ग आहे जेणेकरून तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून जगाकडे जाल.

परंपरेनुसार, असेदेखील सांगितले आहे की एखादी व्यक्ती आध्यात्मिक प्रक्रियेत असेल तर त्या व्यक्तीने दररोज मंदिरात जाण्याची गरज नाही. थोडक्यात, मंदिर ही एक सार्वजनिक बॅटरी-चार्जिंग करण्याची जागा आहे. जर तुमच्याकडे स्वतःला चार्ज करण्याची पद्धती असेल, तर तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही. गावात मंदिर उभारताना सगळेजण योगदान देत असत, जेणेकरून सगळ्यांना त्याचा उपभोग घेता येईल. एक ऊर्जेचे केंद्र म्हणून त्याची उभारणी केली जात.

Web Title: Sadguru Writes On God Existence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sadguru