
सद्गुरू - ईशा फाउंडेशन
सद्गुरू : रमण महर्षींनी हे जाहीरपणे सांगितले होते, ‘आत्म ज्ञानम् अति सुलभम्’, याचा अर्थ असा, की आत्मज्ञान ही या अस्तित्वातली सर्वांत सोपी गोष्ट आहे. ते कठीण नाही. तुमच्या आत जे काही आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कोणती कठीण कामे करावी लागतील? हे फक्त इतकेच आहे की, तुम्ही एकाच वेळी इच्छुकही आहात आणि अनिच्छुकही आहात. हा संघर्ष तुमचा स्वतःचाच आहे.