
Health Insurance Policy: बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी चोराने चाकुने हल्ला केला होता. ज्यामुळे तो जखमी झाला होता. त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो आता ठीक आहे. त्याला लवकर डिस्चार्ज मिळणार आहे. पण सैफ अली खानचा आरोग्य विमा दावा फॉर्म मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर समोर आला आहे. सैफ अली खानची निवा बुपाची पॉलिसी आहे. लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये असे उघड झाले आहे की सैफ अली खानने त्याच्या उपचारासाठी 35.95 लाख रुपयांचा दावा केला होता, त्यापैकी 25 लाख रुपये विमा कंपनीने मंजूर केले आहेत. यामुले विमा काढतांना पुढील गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.