

The Spiritual Perspective: Why Human Life is a Golden Opportunity
योगिराज महाराज पैठणकर
सृष्टीची निर्मिती करीत असताना भगवंताने निरनिराळ्या जीवांची निर्मिती केली. पाण्यात राहणारे, जमिनीवर वावरणारे, पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारे, आकाशात उडणारे, असे त्यांचे प्रकार. आणखी विचार केला तर अंडज, स्वेदज, जारज व उद्बिज. सर्वांच्या ठिकाणी भगवंताने प्राण स्थापिला आहे. एकनाथी भागवतात एकनाथ महाराज म्हणतात-
अंडज- स्वेदज- जारज।
चौथे जाण गा उद्बिज।
त्यांचे ठायी प्राणु सहज। आत्मयोगे सदावर्ते ।। अ. ३ ।।