|| सारासार || : वितभर पोट लागलेसे पाठी...

धावपळीत पोटासाठीच जगताना आपण नाती, समाधान आणि अंतर्मुखतेची खरी श्रीमंती गमावत आहोत, याचे भान देणारा संत नामदेवांचा सारगर्भ विचार
The Infinite Chase: Saint Namdev’s Reflection on Material Needs and Spiritual Void

The Infinite Chase: Saint Namdev’s Reflection on Material Needs and Spiritual Void

Sakal

Updated on

संत नामदेव महाराज

सचिन महाराज पवार

दिवस-रात्र आपली अखंड धावाधाव सुरू आहे. या धावपळीत आपण नेमके काय गमावत आहोत, याचे भान येणे हीच शहाणपणाची खरी सुरुवात आहे. आयुष्यात स्थिरता नाही, चित्त शांत करणाऱ्या सज्जनांची संगत नाही आणि चिंता व दैन्याने मनाचा ताबा घेतलेला आहे. पण अशी अवस्था असूनही आपली धावपळ मात्र थांबत नाही. पोट भरणे हेच जीवनाचे अंतिम व एकमेव कर्तव्य झाले आहे का, याचे आत्मपरीक्षण करायला संत नामदेव महाराज आपल्याला प्रवृत्त करतात.

प्रगतीची सुरुवात परीक्षणापासून होत असते. जोपर्यंत माणूस स्वतःकडे पाहत नाही, तोपर्यंत त्याची धावपळ ही प्रगती नसून केवळ हालचाल असते. रोज सकाळी भाकरीच्या शिकारीसाठी धावणाऱ्या गर्दीचा भाग होणे हे जीवनाचे अंतिम ध्येय ठरू नये. पोटापलीकडील प्रेरणांनी आपल्या अस्तित्वाला अर्थ देणे हे माणसाचे खरे काम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com