संवादसेतू : काही क्षण फक्त माझे!

दैनंदिन धावपळीत स्वतःसाठी काढलेला काही मिनिटांचा शांत विराम सुमित्राताईंसारख्या महिलांना नवऊर्जा देतो; ‘मी टाइम’च्या या साध्या सवयी मानसिक आरोग्याला बळकटी देतात
Corporate Boundary Controls: Preventing Workplace Intrusion on Solitary Rest Intervals

Corporate Boundary Controls: Preventing Workplace Intrusion on Solitary Rest Intervals

Sakal

Updated on

सुमित्राताईंना सकाळी पाच वाजता उठावं लागतं. नवरा आणि मुलगा सकाळी सातच्या आत घराबाहेर पडत असल्याने त्यांना लवकर डबा करून द्यावा लागतो. ते दोघं बाहेर पडले की मात्र कामवाल्या मावशी येईपर्यंतचा वेळ सुमित्राताईंचा स्वत:चा असतो. मग त्या स्वत:पुरता एक कप कडक चहा करतात, पेपर चाळतात, एका ॲपवरचा कार्यक्रम लावून मोजून १५ मिनिटं स्ट्रेचिंगचे व्यायाम करतात, गॅलरीतल्या चार फुलझाडांना पाणी घालतात आणि पाच मिनिटं नुसत्या गॅलरीत थांबून आजूबाजूची गंमत पाहतात. छोट्या मुलांना शाळेत न्यायला आलेले रिक्षावाले काका, ‘मॉर्निंग रन’वरून परतणारे तरुण आणि बाहेर रस्त्यावर भाजी आणि फळवाल्यांकडची गर्दी! हे होईपर्यंत कामवाल्या मावशी येतात. नंतर मात्र सुमित्राताईंचा दिवस अगदी वेगवान असतो. विमा आणि पोस्ट बचतीच्या व्यवसायात असल्यामुळे त्यांना दिवसभर अनेक लोकांना भेटावं लागतं. पहाटे लवकर उठून कामाला लागलेल्या सुमित्राकडे संध्याकाळपर्यंत इतकी ऊर्जा कशी उरते, असं त्यांच्या मैत्रिणी म्हणतात. त्यांना मात्र त्याचं श्रेय सकाळच्या त्या शांत एका तासाला द्यावंसं वाटतं. खरंतर चहा घेणे, पेपर वाचणे, हलका व्यायाम करणे, खिडकीत बसणे, या तद्दन क्षुल्लक गोष्टी वाटतात. पण त्याच सुमित्राताईंना ऊर्जा देणाऱ्या ठरल्या. कारण त्या सुमित्राताई इतर कुणासाठी करत नाहीत, मोबाइल ऐकता ऐकता करत नाहीत... तर मनापासून, फक्त स्वत:च्या शांततेसाठी करतात!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com