Sanitary Pads : महिलांनो सावधान! सॅनिटरी पॅडमध्ये हानिकारक केमिकल?; तपासणीत आढळल्या अनेक गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanitary napkins

Sanitary Pads : महिलांनो सावधान! सॅनिटरी पॅडमध्ये हानिकारक केमिकल?; तपासणीत आढळल्या अनेक गोष्टी

Chemical In Sanitary Pads : मासिक पाळीच्या वेळी वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅड आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. कारण यामध्ये हानीकारक केमिकल असल्याचे समोर आले आहे. टॉक्सिक लिंक या पर्यावरणीय स्वयंसेवी संस्थेने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या "रॅप्ड इन सीक्रेसी: टॉक्सिक केमिकल्स इन मेनस्ट्रुअल प्रॉडक्ट्स" या अभ्यासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: मासिक पाळीत रजा मिळण्याचा कायदा होण्यासाठी मोहीम

सॅनिटरी पॅड्समध्ये phthalates आणि volatile organic compounds (VOCs) सारख्या विषारी रसायन असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासादरम्यान टॉक्सिक लिंककडून देशभरातील आघाडीच्या सॅनिटरी पॅड्सची चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये वरील हानीकारक केमिकल असल्याचे आढळून आले आहे.

पॅड्समध्ये आढळून आलेल्या या हानिकार केमिकल्समुळे त्वचेची जळजळ आणि ऍलर्जी अशा समस्या उद्भभू शकतात. या अभ्यासातून सॅनिटरी पॅड्समध्ये आढळणाऱ्या इतक दूषित पदार्थांबाबतही माहिती समोर आली आहे. ज्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच यामुळे वातावरणात मायक्रोप्लास्टिक कण पसरले जाऊ शकतात. टॉक्सिक लिंकच्या या चाचणीतून देशभरातील दहा प्रसिद्ध ब्रँडच्या पॅड्समध्ये हानिकारक केमिकल्स असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: Prolong Menstrual Cycle : मासिक पाळी लांबवयची आहे? औषध नाही तर करा हे घरगुती उपाय

चाचणीतून काय आलं समोर?

टॉक्सिक लिंकने केकेल्या चाचणीत दहा विविध दहा ब्रॅन्डच्या सॅनिटरी नॅपकीनची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये सर्व नमुन्यांमध्ये 12 विविध प्रकारचे phthalates आणि VOC आढळून आले आहे. चाचणी केलेल्या सॅनिटरी पॅड्समध्ये phthalates चे 19460 µg/kg सर्वाधिक प्रमाण होते. तर, phthalates चे कान्सेंट्रेशन 0.0321 आणि 0.0224 ग्रॅम दरम्यान आढळून आले आहे, जे EU नियमावलीच्या निर्धारित पातळीपेक्षा जास्त आहे.

कर्करोगासह जीवघेण्या आजारांचा धोका

चाचणी करण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड्समध्ये विविध 24 भिन्न VOC आढळून आले आहे. आढळलेल्या VOCs मध्ये xylene, benzene, क्लोरोफॉर्म, trichlorethylene आदी हानिकार केमिकल्सचा समावेश असल्याचे आढळून आले आहेत. या केमिकल्समुळे मेंदूची कमजोरी, दमा, अपंगत्व, कर्करोग आणि प्रजननात समस्या निर्माण होण्याचा धोका अधिक आहे.