संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

संत एकनाथ महाराजांच्या ‘अभ्यास’ संकल्पनेतून संयम, सातत्य आणि सावधानतेने परमार्थप्राप्तीचा मार्ग स्पष्ट; भृंगी कीटकापासून दशरथ मांझीपर्यंतच्या उदाहरणांतून खऱ्या अभ्यासू जीवनाची प्रेरणा
The concept of 'Abhyasa' in the teachings of Saint Eknath Maharaj

The concept of 'Abhyasa' in the teachings of Saint Eknath Maharaj

sakal
Updated on

योगिराज महाराज पैठणकर

अभ्यास’ हा शब्द संतवाङ्‍मयात येतो तो योगमार्गाचे विश्‍लेषण करताना! आसनजय, पवनवश, ध्यान, चित्तस्थिरता आदी अनेक गोष्टींसाठी अभ्यास महत्त्वाचा आहे असे ते सांगतात. येथे अभ्यास या शब्दाचा अर्थ साध्य प्राप्तीपर्यंत करत राहणे असा करता येऊ शकतो. म्हणजे भगवत्प्राप्ती होईपर्यंत त्यामध्ये येणाऱ्या सर्व अडथळ्यांस दूर करून प्रयत्नशील राहणे, असा येथे अभ्यास या शब्दाचा अर्थ करता येतो. एकनाथ महाराज भागवतात म्हणतात,

‘यापरी हळु हळु । अभ्यासे सार्थक करी काळु ।

अविरक्त परी प्रबळु । होय भुकाळु परमार्थी ।। अ.१’

अर्थात- किती कमी वेळेत किती जास्त अभ्यास केला यापेक्षा सावकाश आणि लक्षपूर्वक विशेष अभ्यास करणे महत्त्वाचे आणि परमार्थामध्ये जो भुकाळु- अर्थात परमात्माप्राप्ती आस लावून बसलेला साधक हाच खरा अभ्यासू आहे, असे तात्पर्य आपणास लक्षात घेता येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com