संत नामदेव महाराज : श्रमाचा सन्मान आणि कार्यावरील निष्ठा

जात, व्यवसाय, जन्म नव्हे तर ध्येय, श्रमाचा सन्मान आणि कार्यावरील निष्ठा यांतूनच व्यक्तीचे खरे श्रेष्ठत्व ठरते, असा संत नामदेव महाराजांचा संदेश
The philosophy of dignity of labor in Sant Namdev Maharaj's teachings

The philosophy of dignity of labor in Sant Namdev Maharaj's teachings

Esakal
Updated on

सचिन महाराज पवार

माणूस कोणत्या घरात, कोणत्या जातीत किंवा कोणत्या परिस्थितीत जन्माला येईल, हे त्याच्या हातात नसते; परंतु तो कोणत्या ध्येयासाठी जगेल हे मात्र त्याच्या निवडीवर अवलंबून असते. नामदेव महाराज आपल्या शिंपी समाजाचा उल्लेख कोणत्याही न्यूनगंडाने करत नाहीत आणि जात हे मध्ययुगीन सामाजिक वास्तव असले तरी तिलाच अंतिम सत्यही मानत नाहीत. आजच्या काळात अनेकजण स्वतःची ओळख ही जात, आर्थिक स्थिती, व्यवसाय, करिअर किंवा सामाजिक प्रतिष्ठेशी जोडतात. परंतु संत सांगतात की जन्म हा प्रारंभ आहे, पूर्णत्व नव्हे. व्यक्तीची उंची तिच्या कुळाने नाही, तर तिच्या ध्येयाने आणि जीवनाच्या हेतूने ठरते. आपला हेतू मानवता, सेवा आणि सदाशिवाशी जोडला गेला, तर सामान्य जन्मही असामान्य ठरतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com