

The True Meaning of Tradition and 'Bodh' in Sant Nivrutinath's Lineage
Sakal
अर्जुन महाराज साळुंके
परंपरा म्हणजे मागच्या पिढीने जे स्वीकारले ते पुढच्या पिढीने जसेच्या तसे स्वीकारणे? की मागून आलेल्या विचारामागील तत्त्व जाणून, त्याचा स्वतःच्या अनुभवातून शोध घेणे आणि बदलत्या काळात त्याचा अर्थ नव्याने उलगडणे? एखादी परंपरा केवळ स्मरणात राहते म्हणून ती जिवंत असते, की ती माणसाच्या विचारांत आणि जगण्यात परिवर्तन घडवते म्हणून जिवंत राहते? श्रीनिवृत्तीनाथांच्या परंपरेकडे पाहिले तर या प्रश्नाचे उत्तर ‘बोध’ या संकल्पनेत सापडते.
संत एकनाथ म्हणतात,
आदिनाथापासून । परंपरा आली जाण ॥
ज्ञानदेवा ज्ञान दिलें । चांगदेवातें बोधिलें ॥