

Savata Sagar Premache Aagar Understanding Sant Savata Mali Teachings of Love Devotion and Equality in Marathi Bhakti Tradition
sakal
-प्रभू महाराज माळी
संतवाङ्मयामध्ये प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रेम ही जीव आणि जीवमात्राबद्दल, चराचराबद्दल कमालीची आपुलकी आणि करुणा निर्माण करणारी भावना आहे. प्रेम हे भक्तीतील सर्वोच्च सूत्र मानले गेले आहे.
नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये चर्चा करताना सांगतात, ‘अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम्’- ज्याचे शब्दांमध्ये वर्णन, विश्लेषण करता येत नाही, ती आहे प्रेमस्वरूप नावाची भक्ती. यामध्ये कोणताही स्वार्थ, कोणतीही अपेक्षा, गर्व, अहंकारविरहित जे प्रेम असते, तेच प्रेम भक्तीचे खरे स्वरूप असते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-