

His teachings emphasise Namasmaran, Wari and devotion as the simplest path to attain divine grace.
Sakal
अभय महाराज जगताप
वारकरी संप्रदायाने ज्या तीर्थाचा, देवतेचा, साधनेचा महिमा गायला आहे, त्याचे वर्णन सोपानदेवांच्या अभंगात आले आहे. त्यामध्ये नामस्मरण व वारीसारख्या साधनेचे, समतेसारख्या मूल्याचे महत्त्व गायले आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरचे व विठ्ठलाचेही वर्णन आहे. ते म्हणतात,
उघडली दृष्टी इंद्रिया सकट ।
वैकुंठीची वाट पंढरी जाणा ।।
पंढरपूर हे सोपानदेवांसाठी वैकुंठच आहे. वैकुंठ म्हणजे देवाचे राहण्याचे ठिकाण. विष्णुसहस्त्रनामध्ये वैकुंठ म्हणजे देवाचे एक नावही आहे.