संत सोपानदेव : शांती, क्षमा, दया

संत सोपानदेवांच्या अभंगांतून शांती, क्षमा, दया या त्रिगुणांचा उलगडा; निवृत्तीनाथांच्या कृपेने भक्ती, परब्रह्मप्राप्तीचा मार्ग स्पष्ट
The Warkari tradition teaches that love, humility and chanting Vitthal's name are the true essence of the Pandharpur pilgrimage.

Relevance of Peace and Compassion in Modern Life and Science

sakal

Updated on

अभय महाराज जगताप

शांती, क्षमा, दया, या तीन गुणांचा उल्लेख सोपानदेवांनी दोन अभंगांमध्ये केला आहे. दोन्ही ठिकाणी हा उल्लेख याच क्रमाने आला आहे. एके ठिकाणी आपल्या परमार्थाचे रहस्य उलगडताना त्यांनी या गुणांचा उल्लेख निवृत्तीनाथांसाठी केला आहे.

शांती क्षमा दया निवृत्ती माऊली ।

अखंड साऊली कासवदृष्टी ।।

संत निवृत्तीनाथ हे शांती क्षमा व दयेने परिपूर्ण आहेत. त्यांची प्रेमळ दृष्टी सतत माझ्यावर असते. त्यामुळे सर्वांप्रमाणेच सत्त्व, रज, तम मिश्रित त्रिगुणात्मक जन्म असला तरी शांती क्षमा दया युक्त असलेल्या श्री निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे भक्ती साध्य झाली असे त्यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com