तर काय?

आयुर्वेदशास्त्रामध्ये कुठल्याही प्रकारची इजा झाली किंवा एखादे अवयव काढले तर हे वातदोषाचे असंतुलनाचे कारण ठरते.
pregnant woman

pregnant woman

sakal

Updated on

प्रश्न: ‘संतुलन’चा बाळंत लेप हा कधी लावायचा असतो व तारीख उलटून गेली असली तर लावल्यास कळा येण्याकरिता त्याचा उपयोग होतो का?

- मेधा पाटील, कोल्हापूर

उत्तर - ‘संतुलन’चा बाळंत लेप हा कळा सुरू झाल्यावरती लावायचा असतो. साधारणपणे जेव्हा कळा आठ ते दहा मिनिटांनी यायला लागतात, अशा वेळेला हा लेप नाभीच्या भोवती लावल्यास सुखकर प्रसूती व्हायला मदत मिळते. कळा सुरू करण्याकरिता त्याचा उपयोग होत नाही. बाळंतपणाकरिता जी तारीख दिली जाते, ती सर्वसाधारण मोजमाप करून दिली जाते. याचा अर्थ हा नसतो की त्याच तारखेला डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. डिलिव्हरीच्या तारखेच्या आठ-दहा दिवस अलीकडे-पलीकडेसुद्धा होणे नैसर्गिक असते. मुख्य नवव्या महिन्यात सांगितलेला फेमिसॅन तेलासारखा तेलाचा पिचू, संपूर्ण नऊ महिने व्यायाम करणे, आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तकात दिलेल्या सगळ्या परिचर्येचं पालन करणं हे नैसर्गिक प्रसूती व्हायला मदत करू शकतं. प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अजूनही माहिती मिळू शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com