

Understanding OCD and Early Symptoms in Children
Sakal
डॉ. मृदुला आपटे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
दीपू १२ वर्षांचा हसतमुख आणि आज्ञाधारक मुलगा होता. पण काही महिन्यांपासून काही गोष्टींमुळे तो अस्वस्थ झाला होता. अचानक, कोणत्याही कारणाशिवाय त्याच्या मनात एक भयंकर विचार यायचा- ‘आई-बाबांच्या बाबतीत काही वाईट होणार नाही ना?’ हे मनात आल्यावर भीतीची एक लाट त्याला घेरून टाकायची. एकदा त्याने हे आईला सांगितले. आईने प्रेमाने समजावून सांगितले आणि ‘काळजी करू नको,’ म्हणाली.