

Dr. Malavika Tambe shares effective Ayurvedic hair care tips to prevent hair fall, premature greying, dandruff, and improve overall hair health naturally.
Sakal
डॉ. मालविका तांबे
कुणाच्याही आकर्षक व्यक्तिमत्त्वामध्ये केस याचा खूप मोठा वाटा असतो. काळे, दाट, लांब केस हे व्यक्तीच्या आरोग्याचे मापदंड असतात व सौंदर्यात भर घालणारे असतात. आयुर्वेदामध्ये केस हे जरी मल या विभागात येत असले तरीसुद्धा केसाच्या वाढीकरता केसांचं आरोग्य नीट राहावं त्याच्याकरता खूप सगळे उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. सध्याच्या काळात चुकत असलेली दिनचर्या, राजसिक व तामसिक आहार, अनियमित झोपेच्या वेळा, आयुष्यात असलेले ताण या सगळ्यांमुळे अकालीच केस पांढरे होणे किंवा केस गळणे, टक्कल पडणे इत्यादी सारख्या समस्या जास्त प्रमाणात दिसायला लागलेल्या आहेत. वय झाल्यावरती केस गळणे किंवा केस पांढरे होणे ह्याला रोग म्हणत नाही. पण जेव्हा वीसतीशीतल्या लोकांना अशा प्रकारचे त्रास व्हायला लागतात तेव्हा केसांच्या आरोग्याचा विचार करावा लागतो. आयुर्वेदाच्या मताने केसांचं आरोग्य हे शरीरातले हाडं, रसधातू च कार्य व्यवस्थित होणं व तसेच पित्त संतुलित राहणं या सगळ्यांवरती अवलंबून असते. आज आपण केसांशी संबंधित काही उपयोगी टिप्स पाहूया.