

The Danger of Scalp Acne
esakal
The Danger of Scalp Acne: चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुम येणे ही सामान्य गोष्ट आहे,पण अनेकदा आपल्या डोक्याच्या त्वचेवर (Scalp) देखील लहान लाल पुरळ, पू भरलेल्या गाठी (Pustules) किंवा वेदनादायक फोड येतात. आपण बऱ्याचदा याकडे साधे पिंपल्स किंवा उष्णतेचा त्रास म्हणून दुर्लक्ष करतो. पण,त्वचाविकार तज्ज्ञांच्या (Dermatologists) मते, डोक्यावरील हे पुरळ केवळ खाज किंवा वेदना निर्माण करत नाहीत, तर ते केसांच्या मुळांना (Follicles) कायमचे नष्ट करून तुम्हाला कायमचे टक्कल पाडू शकतात! हा पुरळ नेमका का येतो, त्याचा केसांच्या वाढीवर कसा परिणाम होतो आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर...