

Young Patient Undergoes Scarless Thyroid Surgery at HNCII with Excellent Recovery
sakal
१९ वर्षीय सानियाच्या डाव्या थायरॉईड लोबमध्ये ४ से.मी.ची गाठ (फॉलिक्युलर निओप्लाझम) आढळल्यानंतर तिच्यासमोर शस्त्रक्रियेची गरज निर्माण झाली मात्र, गळ्यावर कायमस्वरूपी डाग राहण्याची भीती तिला सतावत होती. हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एचएनसीआयआय), मुंबई येथील तज्ञांनी तिला 'ट्रान्सओरल एंडोस्कोपिक थायरॉईडेक्टॉमी वेस्टिब्युलर अॅप्रोच (टीओईटीव्हीए)' हा अत्याधुनिक, स्कारलेस पर्याय सुचवला. या पद्धतीत खालच्या ओठाच्या आतील बाजूने तीन लहान छिद्रांद्वारे शस्त्रक्रिया केली जाते, त्यामुळे बाहेर कोणतीही जखमेची खूण राहत नाही.