

Uneven shoulders, a curved spine or changes in body balance in children may indicate scoliosis and should be evaluated at the right time.
Sakal
डॉ. अजय कोठारी, स्पाइन सर्जन
डॉक्टर, माझ्या मुलाचा कणा वाकलेला दिसतोय. हे गंभीर आहे का?’’ हा प्रश्न अनेक पालक विचारतात. काही वेळा मुलांच्या खांद्यांची उंची वेगळी दिसते, काहींची पाठ एका बाजूला उंच वाटते, तर काहींमध्ये कपडे घातल्यावर शरीराचा समतोल बिघडलेला जाणवतो. अनेकदा सुरुवातीला वेदना नसल्यामुळे या बदलांकडे दुर्लक्ष केलं जातं; पण काही रुग्णांमध्ये हा वाकलेपणा हळूहळू वाढू शकतो. कण्याच्या या असामान्य वाकण्याला स्कोलिओसिस (Scoliosis) म्हणतात.
प्रत्येक स्कोलिओसिसला शस्त्रक्रियेची गरज नसते. मात्र, काही निवडक रुग्णांमध्ये योग्य वेळी उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.