

Screentime Affects Children's Brain Health Along With Eyes
sakal
Excessive Screentime Effects on Children's Health: मुलांचा मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, टॅब ही डिजिटल साधने पाहण्याचा वेळ (स्क्रीनटाइम) वाढला आहे. यामुळे केवळ त्यांच्या डोळ्यांवरच नाही, तर मेंदूवरोबरच वागणुकीवरही परिणाम होतो. लहान मुलांच्या मेंदूचा विकास वेगाने होत असतो या काळात जास्त 'स्क्रीन' वापरामुळे त्यांची एकाग्रता कमी होते. म्हणून या भावी पिढीचे भवितव्य वाचविण्यासाठी स्क्रीनटाइम कमी करण्बावत शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतला जावा, अशी मागणी बालरोगतज्ज्ञांकडून होत आहे.
ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी समाज माध्यमांच्या बंदीचा निर्णय घेतला. तर उत्तर प्रदेशात सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये १० मिनिटे वृत्तपत्र वाचन हे सक्तीचे केले आहे. भावी पिढीचे भवितव्य आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी महाराष्ट्रामध्येही असा धोरणात्मक निर्णय युद्धपातळीवर घेण्याची नितांत गरज व्यक्त केली जात आहे.