Self Care Tips: तुम्हाला 'या' सोप्या अन् आरोग्यदायी सवयी देतील दिर्घायुष्य

Self Care Tips: निरोगी राहण्यासाठी आपल्याला चांगल्या सवयी असणे गरजेचे असते.
Self Care Tips
Self Care TipsSakal
Updated on

Self Care Tips: निरोगी राहण्यासाठी ज्याप्रमाणे पोष्टिक आहार आणि योगा करणे गरजेचे असते त्याचप्रमाणे चांगल्या सवयी असणे गरजेचे असते. कारण त्याचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम पडतो. पण या सवयी कोणत्या आहेत हे आज जाणून घेऊया. ज्यामुळे तुम्हाला दिर्घायुष्य मिळू शकते.

पुरेशी झोप

निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घ्यावी. तज्ज्ञांच्या मते ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्यावी. झोपताना मोबाईल आणि लॅपटॉप दूर ठेवावा.

व्यायाम करावा

नियमितपणे व्यायाम केल्याने जुनाट आजारांचा धोका कमी होतो. मनःस्थिती सुधारते आणि तसेच आरोग्य निरोगी राहते. सुर्यनस्कार काढणे, चालणे, सायकल चालवणे यासारखा व्यायाम करावा.

तणाव नियंत्रणात ठेवावे

तणावामुळे मानसिक आरोग्यावर नकारत्मक परिणाम होतो. यामुळे तणाव कमी करण्यासाठी ध्यान करावे, योग करावे.

नविन गोष्टी शिकत राहा

निविन गोष्टी शिकत राहिल्याने मेंदू सक्रिय राहतो. यामुळे सतत नविन गोष्टी शिकण्यावर भर द्यावे. स्मरनशक्ती देखील वाढते.

Self Care Tips
Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार अन् पौष्टिक ज्वारीचा पराठा, जाणून घ्या सोपी रेसिपी

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा

निसर्गाच्या प्रदर्शनामुळे तणाव कमी होतो, मनःस्थिती सुधारते आणि शारीरिक आरोग्य सुधारते. दररोज घराबाहेर वेळ घालवा, उद्यानात फिरायला जा, हायकिंग करा, बागेत जा किंवा नैसर्गिक वातावरणात आराम करा.

वजन नियंत्रणात ठेवावे

वजन नियंत्रणात ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो. संतुलित आहार घ्या, सक्रिय रहा, तुमचे वजन नियमितपणे निरीक्षण करा आणि गरज पडल्यास व्यावसायिक सल्ला घ्या.

उद्देश ठेवावा

आयुष्य जगण्यासाठी उद्देश असणे गरजेचे आहे. यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारू शकते. तसेच छंद जोपासावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com