guillain barre syndrome
sakal
- डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा मज्जासंस्थेचा गंभीर आजार आहे. या आजारात एखाद्या जंतूसंसर्गाविरुद्ध असाधारण प्रतिसाद म्हणून आपल्या शरीराने निर्माण झालेली प्रतिकारशक्ती आपल्याच मज्जासंस्थेला मारक ठरते. आजाराचे नेमके कारण अद्याप कळले नसले, तरी सौम्य विषाणूसंसर्गानंतर तो होत असतो. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा कुठल्याही वयात होऊ शकतो. असा आजार झालेली बहुसंख्य मुले कुठलीही गुंतागुंत न होता बरी होतात.