

Shah Rukh Khan's Fitness Secrets, Simple Diet & Lifestyle That Keep Him Fit at the Age of 60
sakal
फक्त भारतभरच नाही तर संपूर्ण जगातून मोठी फॅन फॉलोविंग असलेल्या, लाखो दिलों की धडकन असलेल्या, बॉलीवूडचा बादशहा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा आज ६०वा वाढदिवस. पण त्याची तंदुरुस्त शरीरयष्टी आणि कायम असलेलं उत्साही व्यक्तिमत्त्व त्याच्यासाठी वय फक्त एक नंबर आहे असंच वाटतं. पण तरुण, हॅंडसम आणि इतकं फिट दिसण्यासाठी किंग खान कोणतंही फॅन्सी डाएट, किंवा प्रोटीन शेक्स घेत नाही. त्याच्या तंदुरुस्त राहण्याचं रहस्य दडलंय त्याच्या शिस्त, मेहनत आणि एकदम साध्या आहारामध्ये.
चला तर मग शाहरुख खानच्या ६०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या फिट राहण्याचं रहस्य जाणून घेऊया.