सक्रिय राहणे हीच आरोग्याची गुरुकिल्ली

हेल्दी फूड
pune
punesakal

आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी सतत सक्रिय राहणे गरजेचे असते. त्यामुळे तुमचा हृदयविकार, मधुमेह व स्ट्रोकसारख्या आजारांपासून बचाव होतो. व्यायामाचा संबंध मानसिक आरोग्यातील सुधारणा व आकलविषयक कार्याशीही येतो. आरोग्यातील सुधारण्यासाठी तुम्ही मॅरेथॉन धावक असण्याची गरज नसून, तुम्ही केवळ सक्रिय राहणे गरजेचे असते. त्यातून पुढील फायदे होतात.

१) तुमच्या हृदयाला व्यायाम मिळतो.

२) तुम्ही काटक राहता.

३) तुमचे वजन नियंत्रणात राहते.

तुम्ही सक्रिया राहण्याची युक्ती म्हणजे तुम्ही असे काही शोधा जे करताना तुम्हाला खूप आनंद मिळेल. काही जणांसाठी हे मित्राबरोबर व्यायामासाठी बाहेर पडणे असू शकते. तुम्ही जिममध्ये जात आहात, घराभोवती चालत आहात, एरोबिक्सची डीव्हीडी लावून नाचत आहात की सायकलवर फेरी मारत आहात, हे महत्त्वाचे नाही. फक्त सक्रिय राहणे गरजेचे आहे. तुमची व्यायामाची पद्धत नक्की कोणती असावी, हे शोधणे जरा कठीण आहे. तुम्ही त्यात काही दिवसांनंतर बदल करीत राहणे आवश्यक आहे. तुम्ही सक्रिय राहावे व सतत सक्रिय राहावे यासाठीच्या टिप्स पुढीलप्रमाणे...

सुरुवात संथ ठेवा

तुम्ही अनेक वर्षांपासून सक्रिय नसाल, तर सुरुवात संथपणे करा. कोणताही व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. ते तुम्हाला कोणती काळजी घेतली पाहिजे, हे सुचवतील. सुरवातीला तुम्ही तुमच्या व्यायामाचा कालावधी ५ ते १० मिनिटेच ठेवा व नंतर त्यात हळूहळू वाढ करीत न्या.

३० मिनिटांचे ध्येय ठेवा

तुमच्या रोजच्या व्यायामाचा कालावधी दररोज ३० मिनिटे असावा, असे ध्येय ठेवा. उदा. तुमचा एका दिवसातील व्यायाम पुढील प्रमाणे असून शकतो - व्यायामाआधी १० मिनिटे नृत्य करणे, जेवणाच्या सुट्टीत पार्किंगमध्ये १० मिनिटे चालणे व घरी पोचल्यानंतर घराच्या परिसरात १० मिनिटे चालणे. यापेक्षा अधिक व्यायाम केल्यास चांगलेच! मात्र तुम्ही स्नायू ताणले जाण्यासारख्या गोष्टी होऊ नयेत याची काळजी घेणेही गरजेचे आहे. तुम्ही आज झेपतो त्यापेक्षा थोडा कमी व्यायाम केल्यास तुम्हाला दुसऱ्या दिवशी व्यायाम करणे सहजशक्य होते.

तुमच्या स्नायूंना व्यायाम द्या

तुमच्या शरीराला केवळ एरोबिक्स प्रकाराच्या व्यायामाची गरज नाही. वजन उचण्यासारखे व्यायामही आवश्यक आहेत. अशा व्यायामांतून तुमच्या स्नायू व हाडांमधील ताकद वाढीस लागते, शरीराचा तोल व समन्वय सुधारतो. अस्थिरोगाचा धोका कमी होतो. वारंवार जखमा होणे व पडण्यापासून बचाव होतो. याची सुरुवात कशी करावी, याबद्दल शंका आहे का...एका सेशनसाठी ट्रेनरची मदत घ्या. रुटीन बसल्यानंतर विशिष्ट व्यायामांसाठीच त्याची मदत घ्या.

व्यायामाचे प्रकार एकत्रित करा

अनेक जिम व कम्युनिटी सेंटर मासिक सदस्यांसाठी काही फ्री क्लासेसची ऑफर देतात. या संधींचा पुरेपूर लाभ घ्या. येथे तुम्हाला व्यायामातील काही नव्या ट्रेंडचा अनुभव घेता येईल. तुम्ही यापैकी कोणत्या व्यायाम प्रकाराच्या प्रेमात पडाल, हे तुम्हालाही समजणार नाही. तुम्हाला जिम नको वाटत असल्यास स्पोर्टस स्टोअरमधून व्यायामासाठी आवश्यक उपकरणांची खरेदी करा. खालील व्यायामांसाठी अगदी थोड्या किंवा कोणत्याही उपकरणांची गरज पडत नाही.

१) चालणे किंवा उड्या मारणे

२) दोरीवरच्या उड्या

३) नृत्य

४) बैठका

५) पुशअप्स

६) घरातील बिन बॅग, जड पुस्तके, पाण्याच्या बाटल्या यांच्या मदतीने वजन उचलण्याचे व्यायाम.

शरीर ताणणे

व्यायामानंतर तुमच्या शरीराला ताण (स्ट्रेच) देणे रोजच्या व्यायामाचा भाग बनवा. त्यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता वाढीस लागते व जखमी होण्याची किंवा स्नायूंमध्ये पेटके येण्याचा धोका कमी होतो.

यातून काय शिकाल...

आरोग्यपूर्ण आयुष्याचा सक्रिय राहणे हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. तुमचे वय वाढत असताना हे अधिक महत्त्वाचे ठरते. तुम्ही दिवासातील ३० मिनिटे सक्रिय राहताना वेगवेगळे प्रयोग करू शकता. बातम्या ऐकताना नृत्य करू शकता, किराणा दुकानापर्यंत चालत जाऊ शकता किंवा जेवणानंतर शतपावली करू शकता. एवढे केलेत, तरी खूप झाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com