Yoga Tips : शिर्षासनाला म्हणतात योगासनांचा 'राजा'; जाणून घ्या फायदे.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga Tips : शिर्षासनाला म्हणतात योगासनांचा 'राजा'; जाणून घ्या फायदे..

Yoga Tips : शिर्षासनाला म्हणतात योगासनांचा 'राजा'; जाणून घ्या फायदे..

आजकाल प्रत्येकजण दैनंदिन जीवनात खूप व्यस्त असतो. त्यामुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही. घरच्या घरी योगा करूनही निरोगी आयुष्य जगता येते. योगासनातील काही प्रकार करणे आरोग्यासाठी अतिशय उपयोगी असते. किमान शिर्षासन तरी रोज करायलाच हवे. शिर्षासनाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. योगासने करणे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. त्याचे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. यामुळेच डॉक्टरही लोकांना योगासनांसाठी दिवसातील किमान 20 मिनिटे काढण्याचा सल्ला देतात. जुनाट आजारांमध्येही योगाभ्यास अत्यंत फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (Shirshasana yoga benefits for health)

शिर्षासनाला 'सर्व योगाचे राजा' म्हणूनही ओळखले जाते. शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि डोक्यापासून पायापर्यंत सरवच अवयवांसाठी शिर्षासन फायदेशीर आहे. पोट निरोगी ठेवण्यासाठी आणि खांद्यांना बळकट करण्यासाठीही शिर्षासन उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया याचा शिर्षासन कसे केले जाते आणि त्याचे फायदे काय आहेत?

हेही वाचा: Apple Benefits : सफरचंद कोणत्या वेळी खावं? तज्ज्ञ सांगतात सफरचंद रात्री खावं का?

शिर्षासन कसे करावे?

शिर्षासन योग करणे थोडे कठीण आहे त्यामुळे तो काळजी घेऊन करावा लागतो. या योगासनाचा सराव तज्ञांच्या देखरेखीखाली केल्यास योग्य ठरेल. सरावामध्ये थोडी जरी चूक झाली तर गंभीर दुखापत होऊ शकते.

प्रथम दोन्ही हाताची बोटे एकमेकांत गुंफून जमिनीवर ठेवा. आता बोटांची गुंफण व हाताच्या कोपरांमध्ये डोके टेकवा. बोटांची गुंफण डोक्याच्या मागील बाजूस येऊ द्या. नंतर पायांचे गुडघे हाताच्या कोपरापर्यंत सरकवून हळू हळू कंबर उचलून पायही छताकडे उंच करा. पाय छताकडे नेत असताना गुडघे मुडपून पाय हळूहळू वर न्या व नंतर पाय ताठ करा. पाय गुडघ्यातून न वाकवता सरळ छताकडे ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. हे आसन करताना घाई करू नका. पायाचे चवडे छताकडे ताणलेल्या अवस्थेत ठेवा. श्वासोच्छवास चालू ठेवा. नंतर पाय हळूहळू खाली आणा. सुरुवातीस काही दिवस पंधरा सेकंद या स्तिथीत राहा.

शिर्षासनाचे फायदे

शिर्षासन योग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. तणाव कमी करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी फायदे होतात. डोळ्यांतील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. हात, खांदे यांच्या स्नायूंना ताकद देते. डोके आणि टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते. पचनक्रिया सुधारण्यासाठी शिर्षासन अत्यंत फायदेशीर आहे.

हेही वाचा: पांढऱ्या रंगाचे लेदरचे शूज स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स, येईल चमक

पाय, गुढगे आणि गुडघ्यांमध्ये रक्त गोठण्याचा आजार कमी करते. ज्यामुळे संधिवात होण्याचा धोका कमी होतो. पिट्यूटरी आणि पाइनल या अंतःस्रावी ग्रंथींसाठी हा एक अतिशय फायदेशीर व्यायाम आहे.

शीर्षासन करताना घ्यावयाची काळजी

मानेला दुखापत झाल्यास किंवा डोकेदुखी झाल्यास हे आसन टाळावे. मासिक पाळी, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या, मेंदूला दुखापत, काचबिंदू, हर्निया यांसारख्या आजारांमध्ये हा योग न करण्याचा सल्लाही दिला जातो.

Web Title: Shirshasana Yoga Benefits For Overall Health Best Yoga For Blood Circulation In Head

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..