
जागतिकस्तरावर १३ ते २५ वयोगटातील १७ कोटींहून अधिक मुले तंबाखूचे वेगवेगळ्या स्वरुपात सेवन करतात. देशात १४.६ टक्के शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनाच्या विळख्यात गुरफटत चालले आहेत. तंबाखुतील निकोटीन नावाचे रसायन मेंदूच्या विकासावर परिणाम करते. यातून नियमित धूम्रपानाची सवय लागते, अशी भीती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विभागीय कर्करोग रुग्णालयाच्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली.