आज हजारो वर्षे उलटून गेली तरी श्रीकृष्णलीला पाहण्याचा, ऐकण्याचा वा वाचण्याचा मोह सर्वांना पडतोच. ज्यावेळी लहान मुलांना गोष्टी शिकवायच्या असतात तेव्हा आणि आजूबाजूच्या सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी श्रीकृष्णांची बाळलीला हा नेहमीचा विषय असतो. भारतीय चित्रकला असो, संगीतकला असो, आजसुद्धा अनेकदा त्यातला विषय ‘श्रीकृष्ण’ हाच असतो.