Vitiligo Disease : त्वचा विकारांबाबत अनभिज्ञता; 4 टक्के नागरिकांमध्ये विटिलिगो आजार

विटिलिगो म्हणजे शरीराच्या काही भागांमधून रंग तयार करण्याच्या पेशी नष्ट होतात.
Vitiligo Disease
Vitiligo Diseasesakal

मुंबई : विटिलिगो या त्वचेच्या आजारासंबंधी देशात अनेक गैरसमज पसरले असल्‍याचे मत तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले आहे. विटिलिगो म्हणजे शरीराच्या काही भागांमधून रंग तयार करण्याच्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे त्वचेचा तो भाग पांढरा दिसायला लागतो. या आजाराबद्दल नागरिकांमध्‍ये अधिक जागरुकता नसल्‍याचे तज्‍ज्ञांनी सांगितले आहे.

मायकेल जॅक्सनदेखील विटिलिगोने त्रस्त होता. राजावाडी रुग्णालयाच्या त्वचाविकार ओपीडीत दररोज १०० रुग्ण येतात. त्यापैकी १० ते १५ टक्के रुग्ण हे विटिलिगोचे असतात. हा सामान्य आजार असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. स्वागता तांबे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

लाईट थेरपी

शरीरात मॅलोनोसाईड्सचे काम सूर्यप्रकाशामुळे सुरू राहते. विटिलिगो जेव्हा शरीरात नियंत्रणात राहतो तेव्हा लाईट थेरेपी देऊन रंग पुन्हा तयार करता येतो. लाईटमुळे केसांच्या भोवती जी जागा असते तिथे त्या पेशी तयार होतात व नवा रंग तयार होतो.

Vitiligo Disease
Skin Care: भाज्या फक्त खाऊच नका, चेहऱ्यालाही लावा! मग ट्राय करा हे फेसपॅक

राजावाडी रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून लाईट थेरेपीची सुविधा उपलब्ध आहे. सर्व पालिका रुग्णालयांत यावर शस्त्रक्रियाही केली जाते.

समुपदेशन गरजेचे

विटिलिगो आजारासंबंधी समुपदेशन फार महत्त्वाचे आहे. हा आजार संसर्गजन्य आहे. विशिष्ट पदार्थ खाल्यामुळे होतो अशा चुकीच्या माहितीमुळे रुग्णाच्या मानसिकतेवर परिणाम होतो. लग्नाची, कामाची चिंता वाढते. त्यामुळे रुग्णांना समुपदेशन महत्त्वाचे आहे.

Vitiligo Disease
Skin Care: पावसाळ्यात सुंदर चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी नक्की फॉलो करा या टिप्स

लक्षणे काय?

त्वचेतील रंग कमी होतो व शरीरावर कुठेही पांढरे चट्टे उमटू लागतात. वयाच्या २० व्या वर्षापर्यंत हा आजार होतो; मात्र हल्ली लहान मुलांमध्ये किंवा वृद्ध लोकांमध्ये आजार आढळतो.

उपचार काय?

  • सनस्क्रीन लोशन लावावे.

  • काही लागण्‍यापासून बचाव करा.

  • रसायनयुक्त कॉस्मेटिक वापरू नये.

  • शस्त्रक्रिया करणे

Vitiligo Disease
Monsoon Skin Problems: पावसाळ्यात लहान मुलांमध्ये उद्भवतायत त्वचेच्या समस्या? मग 'या' टिप्स फॉलो करा!

काय खाऊ नये

• पांढरे पदार्थ, बेकरी पदार्थ

• पिझ्झा, बर्गर

• ग्लुटेन फ्री डायट

विटिलिगोचे उपचार लहान मुलांसाठी वेगळे आहेत. त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया किंवा लाईट थेरेपी दिली जात नाही. त्यांच्या शरीरावर छोटेछोटे पांढरे चट्टे दिसतात आणि त्यांच्यावर औषधे आणि क्रीम्स देऊन उपचार केले जातात.

- स्वागता तांबे, त्वचाविकारतज्ज्ञ, राजावाडी रुग्णालय

व्‍हीटामिन सी आणि ए युक्त आहार विटिलिगोमुळे प्रभावित क्षेत्रासाठी उपयुक्त ठरतो. अंगूर, संत्री, लिंबू, आंबे, गाजर, पपई या पदार्थांचा आहारात समावेश करावा. प्रोटीनयुक्त मासे, चिकन, दुधाच्या सेवनाबरोबरच गहू, तांदूळ, बाजरी, शेंगदाणे, अंडी खाल्ली पाहिजेत. सूर्यफुलाचे तेल, तिळाचे तेल, नारळाचे तेल, बदामाचे तेलही उपयुक्त ठरते.

- डॉ. कीर्ती जांगिड, त्वचारोगतज्ज्ञ, राजावाडी रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com