Health Tips: 5 कप कॉफी प्यायल्यानंतरही झोप येते का? मग करा हा घरगुती उपाय

5 कप कॉफी प्यायल्यानंतरही तुम्हाला झोप का येते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?
Health Tips
Health Tipssakal
Updated on

5 कप कॉफी प्यायल्यानंतरही तुम्हाला झोप का येते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? एका दिवसात 10 कप ब्लॅक टी प्यायल्यानंतरही तुम्हला जागता येत नाही. तर आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की कॅफीनचा तुमच्‍यावर कोणताही परिणाम होत नसण्‍याची अनेक कारणे असू शकतात. झोप टाळण्यासाठी बहुतेक लोक कॉफी किंवा चहाची मदत घेतात.

या दोन्हीमध्ये कॅफिन आढळून येते, ज्यामुळे मानवाला झटपट ऊर्जा मिळते. जर तुम्ही नाश्ता आणि दुपारच्या जेवणानंतर एनर्जी वाढवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. कॅफीन तुमच्यासाठी प्रभावी का नाही हे आधी जाणून घेऊया.

Health Tips
Oral Health Tips : दातांच दुखणं हलक्यात घेऊ नका, असू शकते या गोष्टीची कमी?

झोप न येणे

पहिले आणि कदाचित सर्वात स्पष्ट कारण हे असू शकते की तुम्हाला आधीच झोपायला त्रास होत आहे. अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की जे लोक दिवसात फक्त 3 ते 5 तास झोपतात त्यांच्यावर कॅफिनचा प्रभावही पडत नाही. याचे कारण असे की जेव्हा आपण जागतो तेव्हा आपल्या शरीरात एडेनोसिन नावाचे रसायन तयार होते, ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो आणि आपल्या मेंदूला विश्रांती घेण्यास सांगते.

जेनेटिक प्रॉब्लेम

तुमच्या शरीरात अशी जीन्स असू शकतात, ज्यामुळे कॅफिनचा प्रभाव कमी होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की तुमच्या एडेनोसिन रिसेप्टर्समधील फरक तुम्हाला कॅफीनमुळे उत्साही वाटण्यापासून रोखू शकतात. याचे कारण लिव्हर एंजाइम देखील असू शकतात.

Health Tips
Damask Rose Oil : तब्बल 12 लाख रुपये दराने विकलं जातं गुलाबाचं तेल, का आहे इतकं महाग?

अलर्ट राहण्यासाठी काय करावे?

याचे अगदी साधे आणि सरळ उत्तर म्हणजे कामाला सुरुवात करण्यापूर्वी २० मिनिटे व्यायाम करावा. योग्य आहार घ्या, जेणेकरून तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. लिंबूवर्गीय फळे, केळी आणि भोपळा उत्कृष्ट निवड आहेत. याशिवाय तुम्ही अरोमाथेरपी देखील घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.