Smartphone Vision Syndrome : " चक्क तेवढ्या वेळासाठी मी आंधळी झाले होते.." स्मार्टफोनचा अतिवापर पडला महाग l Smartphone Vision Syndrome case study | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smartphone Vision Syndrome

Smartphone Vision Syndrome : " चक्क तेवढ्या वेळासाठी मी आंधळी झाले होते.." स्मार्टफोनचा अतिवापर पडला महाग

Smartphone Vision Syndrome : हल्ली लोक स्मार्टफोन शिवाय आपल्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही. त्यामुळे बाकी सगळं सोडून फोनचा स्क्रिन स्क्रोल करत राहतात आणि अगदी पापणीही न लवता एकटक त्या स्क्रिनवर बघत राहतात.

तिला दीड वर्षांपासून डोळ्यांच्या समस्यांनी ग्रासले होते. फ्लोटर्स दिसणे, दिवे चमकणे, गडद झिगझॅग रेषा आणि अस्पष्ट दृष्टीचे भाग यासारखे लक्षण दिसत होते. ज्याची दिवसभरात अनेक वेळा पुनरावृत्ती होत असे. असं दर १०-१५ मिनीटांनी होत असे. रात्री वॉशरुमला उठल्यावर तिला डोळ्यांपुढे अंधारी येत असे.

सुरुवातीला, तिने नेत्ररोग तज्ञाशी सल्लामसलत केली ज्यांनी तपशीलवार नेत्रतपासणीनंतर डोळ्यांचा कोणताही आजार नसल्याचं सांगितलं. नंतर तिच्या दृष्टी-संबंधित लक्षणांचे कोणतेही न्यूरोलॉजिकल कारण तर नाही ना हे तपासण्यासाठी तिला न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.

याविषयी डॉक्टर म्हणाले, सर्व न्युरोलॉजिकल तपासणी केल्यावर याचा मेंदूशी किंवा मज्जातंतूशी कोणताही संबंध नाही हे निदान झालं आहे.

जेव्हा डॉक्टरांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ती म्हणाली की, तिने दीडवर्षांपुर्वी आपल्या अपंग मुलासाठी ब्युटिशीयनचा जॉब सोडला. त्यामुळे ती आपल्या स्मार्टफोनवर जास्तीत जास्त वेळ घालवू लागली. तिच्या फोनवर ती ८ ते १० दिवसा आणि रात्रीच्या अंधारात २ तास घालवत होती.

त्यानंतर डॉक्टरांना समजलं की, तिच्या लक्षणांमागे स्मार्टफोनकडे दीर्घकाळ पाहणे हे कारण असावे. डॉक्टर म्हणाले अशा काही प्रकारचे केसेस मागेही बघितले आहेत. त्यामुळे मी अजून काही तपासण्या सांगितल्या नाहीत किंवा काही औषधही दिले नाही. पण त्या महिलेच काउंसिलींग केलं. स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला. त्यावर ती महिला तयार झाली.

महिन्याभरानंतर फेर तपासणीला जेव्हा आली तेव्हा आमच्यासाठी सुखद धक्का होता. तिचे दृष्टीशी संबंधीत सर्व समस्या दूर झाल्या होत्या. तिची दृष्टी सामान्य झाल्याचं तिने सांगितलं. यामुळे हा स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोम असल्याचं सिद्ध झालं.

दृष्टीशी संबंधित समस्या का उद्भवतात?

बुबूळ हलवण्यासाठी डोळ्यांचे सर्व मसल्स त्यात इन्व्हॉल्व असतात. सतत वापराने ते दमतात आणि अशक्त होतात. याचा परिणाम नजरेच्या स्पष्टपणावर होतो. त्यामुळे सामान्य वेळे पेक्षा दुप्पट वेळ दिसण्यासाठी घेतात.

डिजिटल स्क्रीन हिट जनरेट करते. हे स्क्रिन बघताना लोक डोळे कमी मिचकवतात. त्यामुळे डोळे कोरडे पडणे, अंदुक दिसणं आणि दृष्टी संदर्भात इतर लक्षणं दिसतात.

टॅग्स :EyeEye Care