शरीराला ठेवा तंदुरुस्त

मानसिक आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. त्या एकमेकांना साह्य करतात. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलंच असलं पाहिजे.
Smita Gondkar
Smita GondkarSakal

मानसिक आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. त्या एकमेकांना साह्य करतात. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलंच असलं पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन करते. मेडिटेशन म्हणजे ‘नो माइंड स्टेट’. एखादी गोष्ट मन लावून करणं म्हणजेच मेडिटेशन.

मी माझ्या मूडनुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मेडिटेशन करते. एखाद्याला गाणं गायला आवडतं. ते मनापासून गाणं गातात, त्यालाही आपण मेडिटेशन म्हणू शकतो. त्यावेळी दुसऱ्या गोष्टी मनामध्ये येत नाहीत. मला कधीकधी ‘कराओके’ सिस्टिमवर गाणं गायला आवडतं. मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं असल्यास आपण वाईट परिस्थितीतही चांगले निर्णय घेऊ शकतो. कारण, त्यावेळी आपलं मन चांगला विचार करू शकतं.

मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. आपल्या शरीराबरोबरच मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होणं गरजेचं आहे. कारण, मेंदूमध्येही विषारी घटक जमा होऊ शकतात. त्याने रक्तामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला मानसिक आजारही होऊ शकतात. मनामध्ये नकारात्मक भावना येतात.

त्यामुळं रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यासाठी व शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोचण्यासाठी व्यायाम हा एकमेव पर्याय आहे. प्रत्येकानं दररोज व्यायाम केलाच पाहिजे. त्यातूनच भावनिक चढउताराचा समतोल साधला जातो. मी दररोज २० मिनिटं वॉकिंग-रनिंग करते.

योगासन, प्राणायाम महत्त्वाचे

योगासन, प्राणायाम या गोष्टी आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. प्राणायाम व योगासनांतून मन शांत राहतं. प्राणायाम करताना श्वासोच्छासाची विशिष्ट लय असते. प्राणायाम चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे असते. मी रेसिंग करते, त्यावेळी न विसरता योगासनं करते. कारण, तेव्हा एकाग्रता आणि सजगता गरजेची असते. रेसिंगपूर्वी मी सूर्यनमस्कार करते. परिणामी, लक्ष विचलित होत नाही. प्रत्येकानंच स्वतःच्या आरोग्यासाठी योगासने व प्राणायाम शिकून घ्यावेत व ते न चुकता करावेत.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com