

The Evolution of Society and the Role of Ganesha
Sakal
मनुष्य ज्या वेळी एकटा-दुकटा राहात असे, त्या वेळी त्याला श्र्वापदांपासून वा अनोळखी माणसांपासून धोका असे व त्याची त्याला भीतीही वाटत असे. या असुरक्षिततेपासून सुटकेसाठी व भीतीपायी त्याने छोटे गट करून राहण्यास सुरुवात केली असावी. यामुळे काही एका मर्यादेपर्यंत समोर उभ्या ठाकलेल्या संकटाला तोंड देणे सोपे जात असे. नंतर पुढे असे अनेक गट एकत्र राहण्यात अधिक सुरक्षितता वाटू लागल्याने छोटी छोटी गावे तयार झाली. अशा अनेक गावांचा तालुका, अनेक तालुक्यांचा जिल्हा, अनेक जिल्ह्यांचे राज्य व अनेक राज्य मिळून देश व शेवटी पृथ्वीच्या पाठीवरील अनेक देश एकत्र येऊन जी-८, सार्क, युनायटेड नेशन्स अशा संस्था तयार झाल्या.