

Sonu Sood Reveals How He Maintains His Perfect Six Pack Abs Even at the Age of 52.
sakal
Sonu Sood Workout Routine: दमदार अभिनय, समाजासाठी सातत्याने केलेलं काम आणि नम्र व्यक्तिमत्त्व यामुळे बॉलीवूड व टॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सोनू सूद नेहमीच चर्चेत असतो. मात्र त्याची ओळख केवळ अभिनयापुरती मर्यादित नाही; फिटनेस आणि संतुलित जीवनशैलीसाठीही तो अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
अनेक दिग्गज कलाकारांमध्ये सोनू सूद हा असा अभिनेता आहे, जो खऱ्या अर्थाने सिद्ध करतो की वय हा फक्त एक नंबर आहे. सिक्स-पॅक अॅब्स, तंदुरुस्त शरीर आणि कायम ऊर्जावान राहण्यामागे कोणताही शॉर्टकट नसून, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सातत्यपूर्ण फिटनेस मंत्र असल्याचं त्याने स्वतः स्पष्ट केलं आहे.