- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
कॅन्सर हा आजार वैद्यकीयदृष्ट्या जितका जटिल आहे, तितकाच मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही आव्हानात्मक आहे. अनेक वर्षापासून कॅन्सर या आजाराभोवती भीती, गुप्तता आणि चुकीच्या समजुतीचं जाळं विणलं गेलं आहे. मात्र, आजही बरेच लोक कॅन्सर झाल्याचं लपवतात- अगदी कुटुंबीयांपासून, नोकरीच्या ठिकाणापर्यंत.