

Advanced Neurosurgery for Spinal Tumors: Insights by Dr. Jaydev Panchvagh
Sakal
डॉ. जयदेव पंचवाघ, मेंदू आणि स्पाइन सर्जन
किरण साळवी साधारण दोन वर्षांपूर्वी माझ्या क्लिनिकमध्ये भेटलेला मला आठवतो. तो आला त्या आधीची दोन वर्षं पाठदुखीने त्रस्त होता. जवळच्या डॉक्टरांना त्यानं दाखवलं होतं आणि त्याच्या पाठीचा एमआरआयसुद्धा वर्षापूर्वी झालेला होता. पाठीच्या कण्याच्या आत मज्जारज्जू ( स्पायनल कॉर्ड) जाण्यासाठी जी पोकळी असते (स्पायनल कॅनॉल) त्या पोकळीत एक साधारण बोराच्या आकाराची गाठ असल्याचं निदान खरंतर त्याच वेळी झालेलं होतं. किरणला ते माहीत होतं. साध्या प्रकाराची असली, तरीही हळूहळू वाढत जाणारी ही गाठ आहे, हेसुद्धा त्याला माहीत होतं.