

Spiritual Growth Beyond Physical Attachment
सद्गुरू : भौतिकाच्या मर्यादा ओलांडून पुढे जाणे आणि भौतिकाच्या पलीकडील कशाची तरी अनुभूती घेणे, यातच अध्यात्माचा संपूर्ण आयाम सामावलेला आहे. तुम्ही भौतिकाशी फार खोलवर गुंतलेले असाल, तर साहजिकच तुमची देहासक्तीही फार तीव्र असते. उन्नतीच्या मार्गात कामक्रिया स्वतः अडथळा ठरते असे नाही; पण देहासक्ती मात्र नक्कीच अडथळा ठरते, यात काहीच शंका नाही. सहसा कामभावनेतूनच ही आसक्ती वाढते. ब्रह्मचर्याविषयी जे सांगितले गेले आहे, ते याच संदर्भात. पण कामक्रियेमुळे एखादी व्यक्ती आपल्या आध्यात्मिक मार्गावर चालू शकत नाही, असे आहे का? मुळीच नाही; पण सांगायचे असे आहे की, जोपर्यंत तुमचे लक्ष दृढ आणि एकाग्र होत नाही, तोपर्यंत प्रगतीची शक्यता किंवा प्रगतीच साहजिकपणे खूप संथ राहील, कारण तुम्ही एकाच वेळी अनेक दिशांनी विचार करत असता.