
सद्गुरू -
प्रश्न : आध्यात्मिकता आणि भौतिक जीवन सुसंगत आहेत का?
सद्गुरू : भौतिक जीवन म्हणजे काय आणि आध्यात्मिक जीवन म्हणजे काय, या मधला फरक ठरावीक पातळीच्या अज्ञानातून आलेला आहे. कोणत्या गोष्टींना तुम्ही भौतिक म्हणून संबोधत आहात, कोणत्या गोष्टींचा तुम्ही आध्यात्मिक म्हणून उल्लेख करत आहात? तुम्ही जेव्हा इथे बसता तेव्हा, तुम्ही ज्या कशाला तुमच्यातील आत्मा म्हणून संबोधत आहात, त्याला तुमच्या शरीरापासून आपण वेगळा करू शकतो का? तुमचे शरीर हे भौतिक आहे, तेही पृथ्वी आहे.