

Non-Dualistic Metaphysics: Decoupling the Paradox of Divine Merging and Tat Tvam Asi
Sakal
गुरुदेव श्री श्री रविशंकर
ईश्वर म्हणजे काय? ईश्वर नसलेले काय आहे? ईश्वराची व्याख्या असेल, तर ती काय आहे? ज्या क्षणी तुम्ही व्याख्या करता, त्याच क्षणी तुमच्या मनात त्याविषयी एक संकल्पना निर्माण होते. तुम्हाला ईश्वर म्हणजे काय वाटते? तुम्ही त्याचे वर्णन असे करता - जो सर्वत्र आहे; सर्वशक्तिमान आहे; जो या सृष्टीच्या निर्मितीस, पालनपोषणास आणि विसर्जनास जबाबदार आहे; जो सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ आहे.