

Lessons and Wisdom from the Past Year
sakal
गुरुदेव श्री श्री रविशंकर
चेतना तरंग
आत्ताच संपलेले वर्ष आपल्यापैकी प्रत्येकासाठी अनेक भेटवस्तू, अनेक धडे घेऊन आले. काही सुखद, काही कठीण. जीवनातील प्रत्येक गोष्ट ही उत्क्रांतीशील आहे, असेच आपण तिला पाहिले पाहिजे. काही असे क्षण आले असतील जे तुम्हाला नकोसे वाटले, काही अनुभव असे असतील जे टाळावेसे वाटले; पण तरीही त्या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला बळ आणि शहाणपण दिले आहे. हे मान्य करण्यासारखे आहे, त्याला विरोध करण्यासारखे नाही. घडलेले झाकून ठेवू नका. जे झाले ते स्वीकारा, त्यातून शिका आणि पुढे चला.