
Yoga Day 2025: आपली प्रकृती चांगली असावी असे प्रत्येकाला मनोमनी वाटत असते. परंतु प्रकृती चांगली ठेवण्यासाठी नेमके काय करावयाला हवे याची कल्पना असतेच असे नाही. केवळ अधिक खर्च करण्याने प्रकृती सुधारत नसते, किंवा विनाकारण घेत असणाऱ्या टॉनिकवजा औषधांचा फायदा होत नसतो. प्रकृती-स्वास्थ ही प्रत्येकाने स्वतःकरता कमविण्याची गोष्ट असते. ती आपणास दुसरे कोणी देऊ शकणार नाही किंवा आपण विकत घेऊ शकत नाही. प्रकृती चांगली ठेवण्याकरता चौरस आहार, योग्य विश्रांती, मनःशांती, अंतर्बाह्य स्वच्छता या मूलभूत गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेसा व्यायाम.