Summer Care : उन्हाळ्यात या गोष्टी जेवणाच्या ताटात अजिबात नसाव्या, शरीरात वाढेल भयंकर अ‍ॅसिडिटी

उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहीले पाहिजे. नाहीतर शरीरात भयंकर अॅसीडिटी वाढून आरोग्यासाठी ते घातक ठरू शकते.
Summer Care
Summer Careesakal

Summer Care : शरीराच्या कार्यपद्धतीत हवामान महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या खाण्यापिण्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. तेव्हा उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहीले पाहिजे. नाहीतर शरीरात भयंकर अ‍ॅसिडिटी वाढून आरोग्यासाठी ते घातक ठरू शकते.

सध्या उन्हाळा सुरू आहे आणि या काळात टरबूज, लिंबू पाणी, लस्सी यासारख्या थंडगार गोष्टी खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि ताजेतवाने वाटते. मात्र, अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही उन्हाळ्यात खाणे टाळावे.

कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक, नोएडाचे संचालक डॉ. कपिल त्यागी यांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्यात शरीरात अ‍ॅसिडिटी वाढते आणि त्यामुळे शरीराला थंड ठेवण्याचा आणि अ‍ॅसिडिटी वाढू न देण्याचा सल्ला दिला जातो. निरोगी राहण्यासाठी या हंगामात काही पदार्थ टाळणे चांगले.

Summer Care
Acidity : जेवणाआधी या 8 गोष्टी खावू नये, शरीरात दोन पटीनं अ‍ॅसिडिटी वाढेल

या कडक उन्हात हायड्रेटेड राहायचे असेल तर कॉफीचे सेवन टाळा. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. कॉफी शरीराला डिहारयड्रेट करते. कॉफीमुळे शरीराचे तापमान वाढू शकते. त्यामुळे अ‍ॅसिडिटी त्रास वाढू शकतो.

Summer Care
Summer Care

लोणच्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीराचे डिहायड्रेशन होऊ शकते. याशिवाय उन्हाळ्यात लोणचे जास्त खाल्ल्यानेही अपचन होऊ शकते.

सोडा

उन्हाळ्यात कार्बोनेटेड ड्रिंक्स भरपूर प्रमाणात वापरली जातात. या ड्रिंक्स प्यायला मजा येते पण ते आरोग्यासाठी हानिकारक असते. सोड्यामध्ये साखर आणि इतर अनेक हानिकारक गोष्टी असतात, ज्यामुळे शरीराचे निर्जलीकरण होऊ शकते. अशा स्वीट ड्रिंक्समुळे मधुमेह आणि लठ्ठपणाही वाढतो. (Acidity)

Summer Care
Acidity Problems: गॅस आणि पोटफुगीमुळे आहात त्रस्त मग आहेत या Home Remedies

केवळ ज्यूस पिऊ नये

ज्यूस (Drink) प्यायल्याने मन आणि शरीर ताजेतवाने होते, मात्र उन्हाळ्यात फक्त ज्यूसचे सेवन करू नये कारण त्यात फायबर्स नसतात. ज्यूससोबत फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. यामुळे पोषकतत्त्वे वाढते आणि तुमचे पोटही दीर्घकाळ भरलेले राहते

दारू किंवा बियर

अल्कोहोलचे अनेक दुष्परिणाम आहेत परंतु उन्हाळ्यात लोक बिअरचे सेवन करतात. उन्हाळ्यात दारू प्यायल्याने डिहायड्रेशन, डोकेदुखी, कोरडा घसा इत्यादी लक्षणे दिसू शकतात. तसेच, अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीर गरम होते आणि शरीरात घाम वाढू शकतो. घामामुळे डिहायड्रेशनची प्रक्रिया जलद होते.

Summer Care
Summer Care

या गोष्टी खाणेसुद्धा टाळा

वर नमूद केलेल्या गोष्टींव्यतिरिक्त तुम्ही जास्त मीठ आणि जास्त खारट पदार्थ, मिल्कशेक, तळलेले पदार्थ, जंक फूड, आईस्क्रीम, आंबा आणि मांस इत्यादींचे उन्हाळ्यात सेवन करू नये.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com