Stomach Cancer in Young Adults: तरुणांनाही वाढतोय पोटाच्या कर्करोगाचा धोका; चुकीच्या खाण्याचा फटका, रुग्णसंख्या ८ टक्क्यांपर्यंत वाढली

Rising Stomach Cancer Risk Among Youth Linked to Poor Diet: चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे तरुणांमध्ये पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढत असून रुग्णसंख्या ८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
Stomach Cancer in Young Adults

Rising Stomach Cancer Risk Among Youth Linked to Poor and Unhealthy Diet

sakal

Updated on

Lifestyle Diseases in Youth: दूषित पाणी, बाहेरचे खाणे यामुळे जंतू पोटात गेल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. त्यातच दारू, तंबाखू, स्मोकिंगमुळे पोटाचा अल्सर होतो. अनियंत्रित व असंतुलित खानपान, जंक फूड, तिखट-मसालेदार व प्रक्रिया केलेले अन्न, तसेच तंबाखू-गुटख्याच्या सेवनामुळे पोटाच्या कर्करोगाचा जोखीम वाढली आहे. पोटाचा कर्करोग तरुणांनाही गाठत असून ही चिंतेची बाब ठरली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रुग्णांच्या निरीक्षमातून मागील पाच वर्षांत पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण सुमारे ३ टक्क्यांनी वाढले आहे. पूर्वी एकूण सर्वच कर्करोग रुग्णांपैकी ५ टक्के रुग्ण पोटाच्या कर्करोगाचे दिसून येत होते. आता ही संख्या ८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com