

नवीन वर्षात केवळ शारीरिक तंदुरुस्ती राखणे गरजेचे नाही; तर शरीरासोबत मेंदूचे आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सततचा ताण, अपुरी झोप, मोबाईल व स्क्रीनचा अतिवापर यामुळे स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळे नवीन वर्षात दररोज चांगली आणि पुरेशी झोप, ध्यान-प्राणायाम, वाचन, हलका व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे मेंदू सक्रिय व निरोगी राहतो. विस्मरण, डोकेदुखी, चक्कर येणे किंवा झोपेच्या समस्या दुर्लक्षित न करता वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नवीन वर्षात 'निरोगी मेंदू' हा आरोग्याचा पाया ठरू शकतो, असे मत न्यूरोसर्जन व्यक्त करतात.