

Impact of Stress on Women's Gynecological Health: Expert Insights
esakal
Gynecological Health: धकाधकीच्या आणि धावपळीच्या आजच्या जीवनशैलीमध्ये ताणतणाव (Stress) हा जवळपास प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक भाग बनला आहे. पण, हा ताण फक्त मानसिक आरोग्यापुरता मर्यादित नसून तो महिलांच्या शारीरिक आरोग्यासाठी, विशेषतः गायनेकोलॉजिकल हेल्थ (Gynecological Health) साठी अत्यंत घातक ठरत आहे. ऑफिसमधील कामाचा ताण, घर-परिवाराची जबाबदारी आणि इतर अपेक्षांचे ओझे महिलांच्या शरीरावर आणि हार्मोन्सवर वाईट परिणाम घडवून आणत आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, अनेक महिलांना या गोष्टीची कल्पनाच नसते की, दीर्घकाळ टिकून राहणारा हा मानसिक ताण त्यांची गर्भधारणा क्षमता (Fertility) आणि मातृत्वाचे स्वप्न कसे धोक्यात आणत आहे. या गंभीर समस्येची सविस्तर माहिती आणि तज्ज्ञांनी दिलेले महत्त्वाचे सल्ले खालीलप्रमाणे आहेत.