

Sudden Underarm Pain Causes, Symptoms and Warning Signs
sakal
PAINFUL ARMPIT LUMP; WHEN TO SEE A DOCTOR: आपल्याला होत असलेलं मान, पाठ, हात, पाय किंवा पोट दुखणं हे तर नेहमीचंच असतं. पण कधी तरी अचानक तुमची काख दुखत असल्याचा अनुभव तुम्हाला आलाय का? बऱ्याचदा हा त्रास जास्त व्यायाम केल्यामुळे, हातावर ताण आल्यामुळेही होऊ शकतो. पण, काखेत लसिका ग्रंथी (Lymph Nodes), स्नायू (Muscles)आणि नसांचा भाग (Blood Vessels) असल्याने काही वेळा संसर्ग किंवा सूजेमुळेही वेदना जाणवू शकतात. त्यामुळे काखदुखी नेमकी कशामुळे होते आणि कोणती लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.