Sugar Craving : जेवणानंतर तुम्हालाही गोड हवंच असतं? असू शकतात 'या' गंभीर आजारांचे संकेत

बऱ्याच लोकांना जेवण पोटभर झालं तरी शेवटी काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. त्यांना गोड हवंच असते. पण हे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.
Sugar Craving
Sugar Cravingesakal

Suger Craving After Meal : गोड बहुतेक सगळ्यांनाच खायला आवडे. पण बहुतेकदा आपण लोकांच्या तोंडून ऐकतो की, मला जेवणानंतर गोड खायलाच लागतं. काही नाही तर किमान गुळ तरी हवाच. या गोष्टीला आपण बऱ्याचदा लाइटली घेतो. कुछ मीठा तो बनता है म्हणत त्यावेळची ती तल्लफ भागवतो. पण सतत गोड खाल्ल्याने आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गरजेपेक्षा जास्त गोड खाल्ल्याने जाड होणं, डायबेटीस, बीपी आणि डिप्रेशनसारखे आजार होऊ शकतात. तुम्हालाही जर जेवणानंतर गोड खाण्याचं क्रेव्हिंग होत असेल तर हा गंभीर आजाराचा संकेत ठरू शकतो. जाणून घ्या.

लो ब्लड शुगर

जेव्हाही आपण कार्बोहायड्रेट युक्त जेवतो, त्यावेळ पचन यंत्रणा त्याला शुगर मध्ये कन्व्हर्ट करून रक्ताच्या माध्यामातून पेशींपर्यंत पोहचवून एनर्जीमध्ये बदलवतो. पण जेव्हा बऱ्याच वेळ आपण काहीच खात-पित नाही तेव्हा शरीराला एनर्जीची आवश्यकता भासते. त्यावेळी कार्बोहायड्रेट्सची कमतरता भासून शुगर क्रेव्हींग्ज होतात.

Sugar Craving
Health Tips : रात्री उशीरा झोपण्याचे आरोग्यासाठी तोटे

स्ट्रेस हार्मोन्स

हल्ली ताण ही अगदी सामान्य समस्या झाली आहे. ज्यावेळी ताण वाढतो तेव्हा शरीरात कोर्टिसोल आणि अँड्रेनालिन हार्मोन जास्त तयार होतं. शरीरात हे दोन्ही हार्मोन्स वाढल्याने असंतुलन वाढते. ज्यामुळे बीपी आणि इंशुलीनची पातळी वाढू लागते. यामुळेच शुगर क्रेव्हींग्ज होते.

Sugar Craving
Health Tips : लग्नानंतर मुलींच वजन का वाढतं?

झोपेची कमी

सध्याची लाइफस्टाइल ही लोकांच्या स्लीप सायकलवर फार परिणाम करत आहे. उशीरापर्यंत जागल्याने झोप पुर्ण होत नाही. अशात अपूर्ण झोपेमुळे शारीरात ऊर्जेची कमतरता भासते. यामुळे आपल्याला जंक फूड आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. झोप नीट न झाल्याने आपल्या हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्यामुळे शुगर क्रेव्हिंग होतं.

Sugar Craving
Health Tips : सकाळच्या 'या' चुका वाढवू शकतात तुमच्या कंबरेचा आकार

ग्लुकोजची पातळी बिघडणे

बरेच लोक जाडी कमी करण्यासाठी डायटिंगचा आधार घेतात. कडक डाएटने बऱ्याचदा शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते. ज्यामुळे ग्लुकोज स्तर बिघडून शुगर क्रेव्हिंग होऊ लागतं.

Sugar Craving
Men Health : चुकीचा आहार घेतल्याने पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर होतो वाईट परिणाम, हे वाचाच

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com