

The Power of the Sun and Its Role in Life
Sakal
शक्तीचा संतत स्रोत म्हणजे सूर्य. सकाळी पहाटे जाग आली तरी अजून उजाडले नाही या कारणास्तव माणसे झोपून राहतात. पण म्हणजे एखाद्या दिवशी सूर्य उगवलाच नाही तर काय माणसे उठणारच नाहीत, झोपूनच राहतील? कदाचित पहिल्या दिवशी थोडा जास्त वेळ झोपून राहतील, पण हळूहळू खरोखर असे होऊ शकेल की, सर्व जग अंधारात बुडून झोपी जाईल. अशी आहे ही सूर्यशक्ती. सूर्य आहे म्हणूनच जग आहे.