Superfoods
sakal
- डॉ. अजय कोठारी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन
हाडांची ताकद म्हणजे फक्त कॅल्शियमची गोळी नव्हे. आपण रोज ताटात काय वाढतो, तेच आपल्या हाडांचं भवितव्य ठरवतं. अनेक जण म्हणतात, ‘मी औषधं घेतो, तरीही पाठदुखी का होते?’ याचं उत्तर बहुतेक वेळा साधं असतं - आहारातून मिळणारं पोषण अपुरं आहे. हाडांना रोज योग्य इंधन मिळालं, तरच ती मजबूत राहतात. म्हणूनच रोजच्या जेवणात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणं अत्यावश्यक ठरतं - हेच पदार्थ म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील सुपरफूड.