
Superfoods to Lower Cholesterol
sakal
How to Lower Cholesterol: कोलेस्टेरॉल वाढविणाऱ्या पदार्थांमध्ये "मांसाहारा'ला अग्रक्रम आहे. विशेषतः रेड मीट (मटण, हॅम, बीफ), शेलफिश (कोळंबी, खेकडा, लॉबस्टर), प्राण्यांचा मेंदू, कलेजी, किडनी व अंड्यातील बलक यात कोलेस्टेरॉल अधिक आढळते. दुधाच्या पदार्थांमध्ये चीज, पनीर, मलई, लोणी व साजूक तुपात कोलेस्टेरॉल असते. सुके खोबरे, पामतेल, खोबरेल तेल, मार्गरिन व वनस्पती तूप हे कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात. कुठल्याही वनस्पती तेलात कोलेस्टेरॉल नसते. परंतु, अधिक प्रमाणात तेलकट पदार्थ शरीरात गेल्यास त्यातील मेदाचे विघटन करण्यासाठी आपले लिव्हर स्वतः कोलेस्टेरॉलची निर्मिती करते.