Surrogacy Age Limit: सरोगसी कायद्याच्या वयोमर्यादेवर सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण; २०२२ पूर्वीच्या प्रकरणांना दिली सूट

Surrogacy Age Limit Explained: सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टीकरण दिलं: २०२२ पूर्वीच्या सरोगसी प्रकरणांना वयोमर्यादा लागू होत नाही.
Pre-2022 Surrogacy Cases Exempted From Age Restrictions – SC Clarifies

Pre-2022 Surrogacy Cases Exempted From Age Restrictions – SC Clarifies

Sakal

Updated on

SC Rules Surrogacy Age Law Doesn’t Apply to Pre-2022 Cases: सरोगसी कायद्यातील वयोमर्यादेचे नियम हा कायदा लागू होण्यापूर्वी, म्हणजेच २५ जानेवारी २०२२ पूर्वी भ्रूण गोठविण्यासारखी प्रक्रिया सुरू करणाऱ्या जोडप्यांना लागू होणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.

न्यायालयाने सांगितले, की अपत्यप्राप्तीसाठी इच्छुक जोडपे प्रजनन पेशी काढून भ्रूण गोठविण्याच्या टप्प्यात असतील तसेच सरोगसी (नियंत्रण) कायदा, २०२१ लागू होण्यापूर्वी सरोगेट मातेच्या गर्भाशयात भ्रूण हस्तांतरित करण्याच्या टप्प्यावर असेल तर हा कायदा लागू होणार नाही. यासंदर्भातील तीन जोडप्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्या. बी.व्ही. नागरत्न आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com